Deutsches Zentrum für integrative Biodiversitätsforschung (iDiv)
Halle-Jena-Leipzig
 
22.04.2021 | मराठी (Marathi)

परिसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करणारा डंग बीटल(शेणकिडा)

आकृती १: समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय वातावरणात शेणाच्या बीटलची उदाहरणे. (अ) निवासी Aphodius rufipes ही निशाचर सक्रिय प्रजाती आहे जी कृषी परिसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. वटवाघुळांसाठी हा एक महत्त्वाचा अन्न स्रोत आहे. (ब) टनेलर (Onthophagus coenobita) कृषी परिसंस्थेमध्ये आढळतो आणि बहुतेक वेळा लहान माइट्स वाहून नेतो जे शेणाच्या गोट्यांमध्ये वाहून नेण्यासाठी शेणाच्या बीटलचा वापर करतात. (क) नर(Proagoderus watanabe), सबाह, मलेशिया येथे आढळणारी बोगद्याची प्रजाती, शेण खात आहे. (ड)(Paragymnopleurus maurus),सबाह, मलेशिया येथे आढळणारी एक रोलिंग प्रजाती, शेणाचा गोळा त्याच्या मागच्या पायांचा वापर करून सुरक्षिततेकडे ढकलतो.

आकृती २: शेणाच्या बीटलद्वारे वापरल्या जाणाऱ्या तीन वेगवेगळ्या घरट्यांचे धोरण. (अ) रहिवासी बीटल थेट शेणात अंडी घालतात जिथे अळ्या त्यांचा संपूर्ण विकास खर्च करतात. (ब) टनेलर बीटल जमिनीत बोगदे खणतात जिथे ते शेणाचे छोटे गोळे बनवतात ज्यांना ब्रूड बॉल म्हणतात. मादी त्या ब्रूड बॉलमध्ये अंडी घालते, जिथे अळ्या खायला घालतील. (क) रोलर डंग बीटल शेणाचा गोळा तयार करतात आणि ते जमिनीत गाडण्यापूर्वी आणि अंडी घालण्यापूर्वी सुरक्षिततेसाठी बाजूला करतात.

आकृती ३: (अ) एक अबाधित परिसंस्था, (ब) एक मध्यम विस्कळीत किंवा खंडित परिसंस्था, आणि (क) मोठ्या प्रमाणात विस्कळीत किंवा खंडित पारिस्थितिक तंत्रात सस्तन प्राणी, शेणाचे बीटल आणि बिया यांच्यातील सरलीकृत संवाद. प्रजातींचे नुकसान आणि परस्परसंवाद राखाडी रंगात दर्शविले आहेत. तीन प्रकारचे परस्परसंवाद शक्य आहेत: (1) सस्तन-बीज-केवळ सस्तन प्राणी बिया विखुरतात; (२) सस्तन प्राणी-शेणाचे बीटल-बीज पसरत नाही (३) सस्तन प्राणी-शेण बीटल-बीज—दोन्ही सस्तन प्राणी आणि शेणाचे बीटल बिया पसरवतात. माफक प्रमाणात विस्कळीत किंवा खंडित पारिस्थितिक तंत्रात (ब) शेणाचे बीटल त्यांचे खाद्य प्राधान्य वेगळ्या शेणामध्ये बदलू शकतात. हे अत्यंत विस्कळीत किंवा खंडित पारिस्थितिक तंत्र (क) मध्ये घडत नाही, म्हणून बीटल आणि त्याचे परस्परसंवाद नष्ट होतात

Hinweis für die Medien: Die von iDiv bereitgestellten Bilder dürfen ausschließlich für die Berichterstattung im Zusammenhang mit dieser Medienmitteilung und unter Angabe des/der Urhebers/in verwendet werden.

Open PDF in new window.

Paul Manning1, Xin Rui Ong2, Eleanor M. Slade2

1Dalhousie University, Canada
2Asian School of the Environment, College of Science, Nanyang Technological University, Singapore

डंग बीटल हा कीटकांचा एक समूह आहे जो प्रामुख्याने सस्तन प्राण्यांच्या शेणाचा (Dung/ Poop) चा वापर खाण्या साठी आणि घरटे बांधण्यासाठी  करतो.  हे कीटक मातीत शेणाचे विघटन आणि पुनर्वापर (recycle) करण्यासाठी महत्वाचे आहेत, ज्यामुळे शेणातील पोषक तत्वांचा पण पुनर्वापर होतो.

शेणकिडे नैसर्गिक आणि शहरी दोन्ही परिसंस्थांच्या आरोग्य आणि कार्यासाठी अनेक फायदे देतात, जसे की बी-बियाणे पसरवणे, पशूधनाचे आरोग्य जपणे आणि वनस्पतींच्या वाढीस चालना देणे.

या लेखात, आपण शेणकिडा बद्दल मूलभूत घेऊ या. त्यानंतर आम्ही उष्णकटिबंधीय जंगले आणि कृषी परिसंस्थांमध्ये ह्या बीटलचे महत्त्व थोडे खोलवर शोधू.

डंग बीटल बाबत मूलभूत माहिती

काही निसर्ग- माहितीपटातून अनेक वाचकांना डंग बीटल ची ओळख झाली असेल एकदा तुम्ही ह्या  बीटलला कुशलतेने शेणाचा गोळा (प्राण्यांची विष्ठा)  घरंगळत घेऊन जाताना पाहिल्यानंतर, ते दृश्य विसरणे कठीण आहे.  वाचकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांवर शेणाचे बीटल जगाच्या बहुतेक भागांमध्ये (आकृती १अ-ड) आढळतात!

सस्तन प्राण्यांचे शेण अन्न आणि घरटे बांधण्यासाठी वापरण्याच्या सवयीमुळे बीटलच्या या जातीला हे नाव देण्यात आले आहे. शेणाच्या बीटलच्या काही प्रजाती कुजणारे मांस, बुरशी, फळे आणि अगदी मृत मिलिपीड्स (millipedes) आणि मुंग्या देखील निवडतात!  सर्व बीटलप्रमाणे, ह्या किड्यांना पंखांचे दोन संच असतात: एक लवचिक आतील जोडी उड्डाणासाठी वापरली जाते आणि एक कठीण बाह्य जोडी जी चिलखत म्हणून काम करते.

सर्व शेणाच्या बीटलमध्ये डोक्यावर अँटेना(antennae) असतात, जे टोकाला रुंद होतात आणि काही प्रजातींच्या नरांना प्रभावी शिंगे असतात जी ते मादींसाठी एकमेकांच्यात लढताना वापरतात (आकृती १क).  शेणाच्या बीटलच्या 7,000 हून अधिक प्रजाती आहेत आणि दरवर्षी नवीन प्रजाती शोधल्या जात आहेत.

डंग बीटलचे त्यांच्या खाद्य आणि घरटे बनवण्याच्या सवयींच्या आधारे तीन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते (आकृती २). 

  1. रहिवासी ( Dwellers) डंग बीटल: हे किडे शेणाच्या ढिगाऱ्यावर येतात आणि पटकन तिथेच घरोबा करतात. शेणाच्या गोळ्याच्या आत नर व मादी एकत्र येतात आणि अंडी घालतात. एकदा अंड्यातून बाहेर पडल्यानंतर, अळ्या (बीटलचे अपरिपक्व रूप) ह्यांची संपूर्ण जडणघडण शेणाच्या ढिगाऱ्यात होते जे घर आणि अन्नचा स्रोत म्हणून काम करतात (आकृती २अ).
  2. टनेलर्स (Tunnellers)डंग बीटल: ह्या गटाच्या मादी टनेलर बीटल शेणाजवळ येतात आणि जमिनीत बोगदा खोदण्यास सुरुवात करतात. त्या शेणाचे छोटे तुकडे बोगद्यात ओढतात आणि त्या तुकड्यांचे ढेकूळ बनवतात ज्याला ब्रूड बॉल (Brood ball) म्हणतात. नर नंतर मादी आणि तिच्या बोगद्यासाठी स्पर्धा करतात, ज्याचे ते मादीचे मीलन होईपर्यंत आणि शेणात अंडी घालेपर्यंत संरक्षण करतात (आकृती २ब).
  3. रोल्लर्स (Rollers) डंग बीटल: ह्या गटात, नर शेणाजवळ येतो आणि त्याच्या मागच्या पायांचा वापर करून तो शेणाचा गोळा तयार करतो.  शेणाचा गोळा जर मादीच्या आवडला असेल तर तो गोळा मातीत लोळवतो आणि पुरायला लागतो.  एकदा पुरल्यानंतर, मादी गोळ्याच्या आत एक अंडी घालते आणि मग अळ्या( larvae) मोठे होई पर्यंत शेणाच्या गोळ्या मधे सुरक्षित आणि शांत (आकृती २क) जीवन जगतात.

हे किडे खाण्यासाठी आणि घरटे बांधण्यासाठी कोणतीही पद्धत वापरत असले तरी, त्यांच्या ह्या सवयी मुळे जमीनीत सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात,  जे मातीतील इतर प्राणी आणि सूक्ष्मजंतूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच ते वनस्पतींच्या मुळांना पोचणरी पोषक तत्त्वे सुद्धा वाढवतात.   

जंगल परिसंस्थे मधील डंग बीटलचे योगदान

डंग बीटल व ज्या सस्तन प्राण्यांचे शेणावर ते जगतात, त्या दोघां मधे एक वेगळेच नाते निर्माण होते. तसेच नाते सस्तन प्राणी आणि डंग बीटल ह्यांचे फळ देणाऱ्या वनस्पती बरोबर ही होते. प्राण्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया शेणात पसरवायला डंग बीटलचा उपयोग होतो (आकृती ३अ).

म्हणुनच, जर काही सस्तन प्राणी नामशेष झाले, तर याचा परिणाम त्यांच्या शेणावर जगणार्या  डंग बीटलवर होऊ शकतो आणि ज्यांच्या बिया ते पसरवण्यास मदत करतात अशा वनस्पतींच्या वितरणावर देखील परिणाम होऊ शकतो [१] (आकृती ३ब).

आम्ही ब्राझील, सिंगापूर आणि मलेशियाच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये सस्तन प्राणी आणि  डंग बीटल यांच्यातील परस्परसंवादाचा अभ्यास करत आहोत.   बेसुमार जंगलतोड, जंगलाचे विखंडन आणि शिकारीमुळे या उष्णकटिबंधीय जंगलांनी जैवविविधता गमावली आहे. 

आम्ही असे वाटते, की जसजसे जंगले अधिक विस्कळीत होतील आणि लहान तुकड्यांमध्ये विखंडित होतील तसतसे सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची संख्या कमी होईल, डंग बीटल ह्यांची संख्या पण कमी होत जाईल.

अम्हाला असे आढळले की, मोठ्या आणि निरोगी उष्णकटिबंधीय जंगलाच्या तुलनेत सस्तन प्राणी, शेणाचे बीटल आणि फळ देणारी वनस्पती यांच्यातील गुंतागुंतीचा परस्परसंवाद  जास्त करून अशांत भाग आणि  सुटी सुटी असलेल्या जंगलात चांगला आहे वा त्यामुळे अशा जंगलामधे ह्या तिघा प्रजातीनी आपला टीकाव धरला आहे.

आमचा अनुमान तपासून पहायल, आम्ही एक प्रयोग करायचा ठरविला; आम्ही जंगलांपासून ते तेल पामच्या मळ्यापर्यंतच्या जागेत, वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांच्या शेणाचे सापळे लावले. आम्ही मोठे व लहान दोन्ही वनक्षेत्र चे निरिक्षण केले. त्यानंतर आम्ही प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक शेणाच्या गोळ्या कडे आकर्षित होणारे बीटल मोजले आणि त्यांच्या प्रजाती ओळखल्या.

आम्हाला आढळले की उष्णकटिबंधीय जंगलातील डंग बीटल-सस्तन प्राणी ह्यांचे नाते बऱ्यापैकी लवचिक आहेत, म्हणजे  जंगलात लॉगिंग( logging) आणि विखंडन यांच्या मुळे ते फारसे बदलत नाहीत. आम्हाला असे वाटते कारण शेणाचे बीटल सर्व प्रकारचे शेण खाताना दिसले.

बहुतांश बीटलचे एका विशिष्ट खाद्य प्रकार असते, तर काही बीटल फक्त एकाच शेणाच्या प्रकारावर जगत असतात.  म्हणून, एखाद्या क्षेत्रातून एक सस्तन प्राणी नष्ट झाल्यास, बहुतेक शेणाचे बीटल त्यांच्या पुढील जेवणासाठी दुसऱ्या सस्तन प्राण्यांच्या शेणात जाऊ शकतात  (आकृती ३ब).

आम्हाला आढळले की काही शेणाचे बीटल तर अजगराचे  विष्ठा पण खातात! तथापि, जरी डंग बीटल व प्राणी ह्यांचे परस्पर नाते लवचिक असते, तरीही आम्हाला आढळले की तेल पाम (Palm trees plantation) आणि लहान व छोट्या जंगल पॅच सारख्या मोठ्या प्रमाणात विस्कळीत (Disturbed)  जागेत हा परस्पर संवाद सोपा  झाला आहे. कारण तिथे कमी डंग बीटलच्या प्रजाती आढळून येतात आणि बीटल आणि सस्तन प्राणी यांच्यातील परस्परसंवाद सुद्धा कमी असतो. [२](आकृती ३क).

बीटल पकडण्यासाठी शेणाच्या सापळ्याचा वापर केल्याने बीटल शेणाकडे आकर्षित होतात की नाही हे आपल्याला कळते, परंतु ते बीटल खरोखरच त्या शेणाचा खाद्य  म्हणून उपयोग करतात की नाही हे कळत नाही.

प्राणीसंग्रहालयात ठेवलेल्या प्राण्यांचे शेण सहज सापडत असल्यामूळे ह्या शेणाचा सापळ्याचे आमिष दाखवू शकतो.  सुदैवाने, नवीन प्रयोगशाळा पद्धतींमुळे बीटल नेमके कोणत्या सस्तन प्राण्यांचे शेण खातात हे कळत आहे.

म्हणून, सध्या आम्ही बीटलच्या आतड्यांमधील अनुवांशिक सामग्रीचे (Genetic material) विश्लेषण करण्यासाठी बीटलच्या आतड्यांचे विच्छेदन करत आहोत. या पद्धतीमुळे बीटल पकडण्यापूर्वी कोणत्या सस्तन प्राण्याचे शेण खात होते हे ओळखता येते. आम्हाला आशा आहे की ह्यामुळे आम्हाला दुर्मिळ किंवा अभ्यास करण्यास कठीण असलेल्या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आणि मोठ्या जंगलामधे राहणारे सस्तन प्राणी आणि शेण बीटल यांच्यातील परस्परसंवादांसह अधिक चांगल्या प्रकारे दस्तऐवजीकरण करण्यास मदत होईल.

कृषी परिसंस्थे मधील डंग बीटलचे योगदान

डंग बीटल हे कृषी परिसंस्थेचे महत्त्वाचे सदस्य आहेत आणि  हे बीटल अन्न उत्पादन वाढव्ण्यास मदत करतात हे अनेक संशोधकांनी सिध्द केले आहे [३].

उदाहरणार्थ, गायी आणि इतर शेतातील प्राण्यांना चावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या माशा, त्यांची अंडी शेणात घालतात आणि अपरिपक्व माशीच्या अळ्या जेव्हा अंड्यातून बाहेर येतात, तेव्हा शेण खातात.  शेणाचे बीटल शेतातील जनावरांचे शेण पोखरतात त्यावेळी  ते माश्यांना प्रजननासाठी उपलब्ध होत नाही , जेणेकरुन मेंढ्या, गायी आणि घोडे यांसारखे शेतातील प्राणी निरोगी ठेवण्यास मदत होते.

डंग बीटल हे गायी - गुरे ह्यांचे (parasitic infection) पासून रक्षण करतात. ह्र कृमी कीटक गायी - गुरे ह्यांच्या शेनामधून गवतात जातात वा गायी- गूरे हे गवतात चरत असताना त्यांच्या पोटात जातात. त्यामूळे गुराना जंतुसंसर्ग हाऊ शकतो.

डंग बीटल जेव्हा शेण पोखरतात तेव्हा ते शेण सुक्ल्यामुळे हे कृमी कीटक मरुन जातात. यामुळे अंडी नष्ट होतात आणि कुरणात  नेमाटोड्सची संख्या कमी होते, ज्यामुळे कमी गुराना संसर्ग होतात.  ह्या टनेलिंग कृतीमुळे मातीचे चांगले मिश्रण होते व मातीचा पुनर्वपर देखील होण्यास मदत होते. ह्यामुळे मातीतून पोषक तत्वांची हालचाल होण्यास मदत होते जेणेकरून ते वनस्पतींना उपलब्ध होतात.

शेणाचे बीटल तुलनेने लहान आणि बऱ्याचदा गुप्त असल्याने, अनेक शेतकरी हे ओळखू शकत नाहीत की शेणाचे बीटल त्यांच्या शेतात राहतात. तथापि, त्यांचा आकार लहान असूनही, शेणाचे बीटल एकट्या युनायटेड किंगडममधील पशु उद्योगाला दरवर्षी सुमारे 367 दशलक्ष पौंड वाचवतात [४]

 डंग बीटल कुरणांच्या बाबतीत बरेच संवेदनशील असतात. एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी आयर्लंडमधील कुरण मालिकेतून बीटल गोळा केले [५].  त्यांनी कृत्रिम खते आणि कीटकनाशके वापरणाऱ्या पारंपारिक शेतांची तुलना सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या शेतांशी केली, ज्याचा वापर केला नाही. संशोधकांना असे आढळून आले की सेंद्रिय खत वापरलेल्या शेतात शेणाच्या बीटलचे प्रमाण जास्त आहे आणि इतर प्रकारच्या शेतांपेक्षा शेणाच्या बीटलच्या प्रजाती जास्त आहेत.

ह्यावरून आम्हाला आढळून आले की शेणाच्या बीटलच्या प्रजाती जास्त असल्याने वनस्पतींची वाढ होते, परंतु जमिनीतील air pockets चीसंख्या सुधारण्यासाठी त्याचा कोणताही फायदा होत नाही [६].

जंतूनाशके देखील कृषी परिसंस्थेमध्ये राहणाऱ्या शेणाच्या बीटलसाठी गंभीर धोका आहेत. गायी-गुराना टिक्स, पिसवा आणि नेमाटोड्स सारख्या जंतूपासून संरक्षण करण्यासाठी दिलेली औषधे आहेत.  हे जंतू प्राण्यांचे रक्त  रक्त पिऊन त्याना आजारी करतात व कधीकधी रोग पसरवतात.

ही औषधे  सामान्यत: जनावरांच्या शेणातून शरीरा बाहेर फेकली जातात व जेव्हा ते शेण खातात तेव्हा शेणाच्या बीटलवर देखील परिणाम करू शकतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, आम्हाला आढळले की सामान्यतः शेतातील जनावरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार्या जंतूनाशक औषधं शेणाच्या बीटलांना मारून टाकू शकतात किंवा त्यांचे प्रजनन थांबवू शकतात.  यामुळे शेणाच्या बीटलचे आरोग्य आणि संख्या कमी होते [६].  कमी जंतूनाशक वापर करून, जास्त प्रमाणात असे जंतू असलेल्या प्राण्यांवर उपचार करून किंवा शेणाच्या बीटलसाठी कमी विषारी उपचार निवडून शेतकरी त्यांच्या शेणाच्या बीटलचे संरक्षण करू शकतात.

डंग बीटल हे आपल्या साठी मौल्यवान आहे

तर आपण बघितले की डंग बीटल मौल्यवान आहेत. त्यांच्या नैसर्गिक आणि कृषी परिसंस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पर्यावरणीय भूमिका आहेत आणि आम्हाला परिसंस्थेच्या आरोग्याबद्दल अधिक समजून घेण्यात मदत करू शकतात.  उदाहरणार्थ, शेणाचे बीटल सस्तन प्राण्यांशी जोडलेले असल्यामुळे, जर आपल्या लक्षात आले की शेणाच्या बीटलच्या काही प्रजाती आपल्या जंगलातून नाहीशा होत आहेत, तर हे सूचित करते की जंगलातील सस्तन प्राणी देखील नाहीसे होत आहेत.

माती आणि वनस्पती निरोगी  ठेवण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते, जे शेणाचे बीटल आणि इतर मातीतील प्राणी पुरवण्यास मदत करतात.  रासायनिक शेती मुळे पर्यावरणचा नाश होतो आहे. शेणाचे बीटल आणि इतर मातीतील प्राणी गायब झाल्यामुळे आपल्या जमिनी नापीक होतील आणि अनेक वनस्पतींच्या बिया विखुरल्या जाणार नाही व वनस्पती वाढु शकणार नाही.

डंग बीटल आप्ल्या विचीत्र वर्तनासथी अनेक संशोधका चे लाडके आहेत. हे किडे आकाशगंगा (Milky way)ला अनुसरून आपले मार्गक्रमण करतात. एखादे वनस्पती हे ह्या किड्यांना फसविण्यासाठी हरिणाच्या शेणाचा वास पसरवतत व डंग बीटल कडून आयते बिया पसरविण्याचे काम करून घेतात.

म्हणूण हे आकर्षक व मजेदार कीटक तुम्हाला कधी कुठे भेटतील सांगता येत नाही. तेव्हा आपले डोळे  नेहमी उघडे ठेवा. तुम्ही कोणते शोध लावू शकता हे तुम्हाला कधीच कळत नाही!

पोचपावती

साबाह, मलेशिया येथे काढलेल्या शेणाच्या बीटलचे फोटो वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही चिएन सी. ली यांचे आभारी आहोत—त्याची छायाचित्रण www.chienclee.com वर मिळू शकते.

शब्दावली

सेंद्रिय पदार्थ
वनस्पती, बुरशी आणि प्राणी यांसारख्या मृत जीवांच्या अवशेषांमधून आलेली संयुगे.

विखंडन
लहान पॅचमध्ये विभाजित होण्याची प्रक्रिया.

जैवविविधता
पृथ्वीवरील जीवनाची विविधता.

लवनचि
वातावरणातील बदलांचा सामना करण्यास सक्षम.

परिसंस्था
पृथ्वीवरील सजीव व निर्जीव घटकांसह विशिष्ट ठिकाणी राहणारे प्राणी, वनस्पती, जीवाणू आणि बुरशी यांचा समुदाय.

नेमाटोड्स
जंतूचाा एक गट, ज्याला राउंडवॉर्म्स (roundworms) देखील म्हणतात, माती आणि जलीय वातावरणात आढळतात जे वनस्पती आणि प्राण्यांच्या आतड्यामध्ये वा अंगावर असू शकतात.

जंतूनाशके
प्राण्यांना त्यांचे जंतू  मारण्यासाठी दिलेली औषधे.

 

संदर्भ

[१] Raine, E. H., and Slade, E. M. 2019. Dung beetle–mammal associations: methods, research trends and future directions. Proc. R. Soc. B 286:20182002. doi: 10.1098/rspb.2018.2002

[२] Ong, X. R., Slade, E. M., and Lim, M. L. M. 2020. Dung beetle-megafauna trophic networks in Singapore’s fragmented forests. Biotropica 52:818–24. doi: 10.1111/btp.12840

[३] Nichols, E., Spector, S., Louzada, J., Larsen, T., Amezquita, S., Favila, M., et al. 2008. Ecological functions and ecosystem services of Scarabaeinae dung beetles. Biol. Conserv. 141:1461–74. doi: 10.1016/j.biocon.2008.04.011

[४] Beynon, S. A., Wainwright, W. A., and Christie, M. 2015. The application of an ecosystem services framework to estimate the economic value of dung beetles to the UK cattle industry. Ecol. Entomol. 40:124–35. doi: 10.1111/een.12240

[५] Hutton, S. A., and Giller, P. S. 2003. The effects of the intensification of agriculture on northern temperate dung beetle communities. J. Appl. Ecol. 40:994–1007. doi: 10.1111/j.1365-2664.2003.00863.x

[६] Manning, P., Slade, E. M., Beynon, S. A., and Lewis, O. T. 2017. Effect of dung beetle species richness and chemical perturbation on multiple ecosystem functions. Ecol. Entomol. 42:577–86. doi: 10.1111/een.12421

 

संपादक: हेलन फिलिप्स

CITATION: Manning P, Ong XR and Slade EM (2021) Soil Ecosystems Change With Time. Front. Young Minds. 9:543498. doi: 10.3389/frym.2021.543498

CONFLICT OF INTEREST: लेखक घोषित करतात की हे संशोधन कोणत्याही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंधांच्या अनुपस्थितीत आयोजित केले गेले आहे ज्याचा संभाव्य conflict of interest म्हणून समजला जाऊ शकतो.

COPYRIGHT © 2021 Manning, Ong and Slade. This is an open-access article distributed under the terms of the Creative Commons Attribution License (CC BY). The use, distribution or reproduction in other forums is permitted, provided the original author(s) and the copyright owner(s) are credited and that the original publication in this journal is cited, in accordance with accepted academic practice. No use, distribution or reproduction is permitted which does not comply with these terms.

 

तरुण समीक्षक

FDR-HB_PERU iGEM टीम, वय: 14-17
आम्ही लिमा, पेरू येथे आंतरराष्ट्रीय जनुकीय अभियांत्रिकी मशीन (iGEM) सह कृत्रिम जीवशास्त्र संघ आहोत.  आम्ही लॅटिन अमेरिकेतील एकमेव शालेय संघ आहोत आणि बॅक्टेरियाचा वापर करून कॅडमियमसाठी डिटेक्टर तयार करण्याच्या आमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे.  आमच्या पैकी बहुतेक लोक द्वितीय भाषा शिकणारे आहेत आणि आमच्या गटाची वयोमर्यादा 14-17 वर्षे आहे.  आम्हाला GMO आवडतात!

लेखक

पॉलमॅनिंग
पॉल हे डलहौसी विद्यापीठातील कृषी विद्याशाखेत पोस्ट-डॉक्टरेट फेलो आहेत.  त्यांनी बी.एस्सी. नोव्हा स्कॉटिया कृषी महाविद्यालयातून कृषी विषयात केली आहे आणि डी.फिल. हे ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्राणीशास्त्रात केले आहे. 2013 पासून ते डंग बीटल इकोलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजीवर काम करत आहेत. त्यांच्या संशोधनाचे उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की कीटक समुदाय कृषी परिसंस्थेतील इकोसिस्टम फंक्शन्स (जसे शेणाचे विघटन) कसे समर्थन करतात.  पॉलला समुदाय गटांशी बोलून, तरुणांसोबत काम करून आणि सहभागी नागरिक विज्ञानाद्वारे संशोधन आयोजित करून कीटकांबद्दलची सार्वजनिक समज आणि प्रशंसा वाढविण्यात देखील रस आहे.  *paul.manning@dal.ca

झिनरुईओंग
झिन रुई ह्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील एशियन स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटमधील Ph. D विद्यार्थी.  त्यांनी  नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधून बी.एस्सी.  जीवन विज्ञान ह्या विषयात केले आहे, तसेच पर्यावरण जीवशास्त्र मध्ये specialization केले आहे. झिन रुईला  पदवीपूर्व वर्षांमध्ये डंग बीटलच्या आकर्षक जगाची ओळख झाली होती आणि त्या  आता डंग बीटलच्या विविधतेचा आणि आग्नेय आशियातील सस्तन प्राणी समुदायांसोबतच्या त्यांच्या संवादाचा अभ्यास करत आहे.

एलेनॉरएम. स्लेड
एलेनॉर हया एशियन स्कूल ऑफ द एन्व्हायर्नमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.  त्यांनी  B.Sc. लीड्स विद्यापीठातून प्राणीशास्त्रात, M.Sc.  एबरडीन विद्यापीठातून इकोलॉजीमध्ये आणि डी.फिल.  ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्राणीशास्त्रात केले आहे. एलेनॉर एक पर्यावरणशास्त्रज्ञ आहे ज्यांचे संशोधन उष्णकटिबंधीय वन लँडस्केप आणि कृषी प्रणालींचे संवर्धन, व्यवस्थापन आणि पुनर्संचयित करण्यावर केंद्रित आहे.  त्यांना  इनव्हर्टेब्रेट्समध्ये विशेष रस आहे आणि ती 17 वर्षांपासून शेणातील बीटल आणि निरोगी इकोसिस्टमसाठी त्यांचे महत्त्व अभ्यासत आहे.  एलेनॉरला ऑइल पाम उद्योगातील धोरण आणि सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यासाठी विज्ञान वापरण्यात देखील रस आहे.

TRANSLATOR

NUPUR SAWANT

FUNDING (TRANSLATION)

The team Translating Soil Biodiversity acknowledges support of the German Centre for integrative Biodiversity Research (iDiv) Halle-Jena-Leipzig funded by the German Research Foundation (DFG FZT 118, 202548816).

Diese Seite teilen:
iDiv ist ein Forschungszentrum derDFG Logo
toTop