गांडूळ व त्यांची हरितगृहवायू उत्सर्जनात असलेली भूमिका
Open PDF in new window.
Pierre Ganault1*, Sacha Delmotte 2, Agnès Duhamet 2, Gaëlle Lextrait 2, Yvan Capowiez3
1 CEFE, Univ. Montpellier, CNRS, EPHE, IRD, Univ. Paul-Valéry Montpellier, Montpellier, France
2 Université de Montpellier, Montpellier, France
3 INRAE, UMR 1114 EMMAH, INRAE/Université d’Avignon, 84914 Avignon, France
मुलांनो, आज आपण एक अतिशय उपयूक्त अश्या किड्याची माहिती घेणार आहोत. आज आपण गांडूळ ह्या माणसाला अत्यंत उपयोगी ठरणारया किड्या बद्दल थोडी वेगळी माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे का ह्या जगातले सर्व गांडूळ एकत्र केले तर त्यांचे वजन हे कोणत्याही जमिनी वर रहाणार्या प्राण्या पेक्षा जास्ती भरेल! ह्या जगात गांडूळांच्या एकूण ७००० प्रजाती आहेत व हे किडे मातीचे पोषण करण्याचे कार्य करतात जेणे करून मातीतून निरोगी रोपे उगवतात. म्हणून हया किड्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. गांडुळांमुळे मातीत आणि त्यांच्या आतड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचीच्या जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन मिळते. काही शास्त्रज्ञांच्या मते हे जीवाणू हरितगृह वायुंच्या जसे कार्बन डायऑक्साइड [CO2] आणि नायट्रस ऑक्साईड[N2O] उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. हे वायू तापमानवाढीला कारणीभूत आहेत. तर मग गांडूळ हे पर्यावरणासाठी चांगले की वाईट? ह्या लेखात गांडूळ आणि हरितगृहवायू ह्यांचा आपापसात संबंध आहे का? हे आपण बघणार आहोत. तसेच ह्या प्रयोगांच्या मर्यादा काय आहेत हे पाहणार आहोत.
परिसंस्थचे अभियांत्रिकी - गांडूळ
आपल्या पायाखालच्या जमिनिखाली असंख्य किडे वळ्वळत असतात, त्या पैकी गांडूळ हे महत्वाचे होय. जगभरातील संशोधकांच्या मते गांडूळंच्या एकूण 7000 प्रजाती आहेत. पण त्याहूनही नोंद न केलेल्या जवळजवळ 30000 प्रजाती आहेत.
गांडूळ हे अपृष्ठवंशी(पाठीचा कणा नसलेले) असल्या मुळे त्यांच्या अंगात हाडे नसतात. ईतर किड्यां प्रमाणे त्यांच्या अंगावर exoskeleton नसतो. पण त्यांचे स्नायू हे मोठे ताकदवान असतात. ह्या स्नायूंच्या आधारे गांडूळ जमिनीतून मार्गक्रमण करतात. जरी सर्व गांडूळ एक सारखे दिसतात तरी त्यांच्या जीवनशैली नुसार त्यांचे तीन उप प्रकार (ecological groups) आहेत(आकृती १अ [२]) ते खालील प्रमाणे:
1. Epigeics ग्रूप: हे गांडूळ आकाराने छोटे (३- १० सें.मी) व लाल रंगाचे असतात. ह्यांचा ऊपयोग गांडूळखता साठी करतात.ह्यांचा रंग ultraviolet किरणोत्सर्ग व पृष्ठभागावरील भक्षकांपासून त्यांचे संरक्षण करतो. ते मृत व खाली पडलेल्या पानांमध्ये राहतात. मातीत खोल न जाता ते मृत पाने खातात आणि त्यांचे रुपांतर cast नावाच्या सेंद्रिय पदार्थ मधे करतात. हा पदार्थ त्यांच्या विष्ठेमध्ये असतो.
2. Endogeic ग्रूप: हे गांडुळे मातीत राहतात आणि असंख्य बीळ तयार करतात(आकृती १ ब) ते आकाराने मोठे (५-१५ सें .मी ) आणि पूर्णपणे रंगविरहित आहेत. एका प्रयोगादरम्यान असे दिसून आले की यापैकी ४ गांडुळांनी ६ आठवड्यांत २.२ किमी लांब आणि ३.५ मिमी रुंद असे बोगद्या सारखे बीळ तयार केले होते. हे गांडूळ बीळ बनवत असताना मातीमधील छोटी छोटी मृत पाने खातात व मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळतात.
3. Anecic ग्रूप: ह्या ग्रूप चे गांडूळ सर्वात मोठे असतात. ते १० सें. मी ते १ मीटर पर्यंत वाढतात. ते खोल उभी बीळ खणतात जी, कधीकधी एक मीटर खोल असतात. आकृती १) रात्रीच्या वेळी ते पृष्ठभागावरील मृत पाने तोंडात पकडतात आणि मातीत खोल घेऊन जातात. हयासाठी ते फक्त त्यांचे डोके बाहेर काढतात, म्हणूण त्यांचे डोके लाल रंगाचे असते.
गांडुळांच्या दोन मुख्य क्रिया म्हणजे मेलेली पाने खाणे व त्याना मातीत खोल गाडणे आणि बीळ तयार करून मातीतून फिरणे. या क्रिया मातीसाठी, मातीतील ईतर जीवासाठी आणि संपूर्ण परिसंस्थेसाठी उप्यूक्त आहेत. म्हणून गांडुळे परिसंस्थचे अभियांत्रिकी (ecosystem engineer) म्हणून ओळखले जातात.
गांडूळांमुळे मातीत होणारे बदल
गांडूळांनी मातीत केलेले बीळामुळे मातीत मोकळी जागा निर्माण होते. ह्या बीळां मध्ये मग इतर जीवजंतू वा छोट्या रोपांची मुळे ह्याना आश्रय मिळ्तो. ह्या बीळांमुळे मातीत Oxygen वायू व पाणी खेळण्यास मदत होते.
कॅपोविझ आणि इतर [३] संशोधकांनी केलेलया प्रयोगात Endogenic ग्रूप च्या गांडूळ नी केलेल्या बीळांमुळे मातीत पाणी झिरपण्याचा वेग हा 5.2 लिटर प्रती मिनिट आहे. यात तोच anecic ग्रूप चा वेग 12.4 लिटर प्रती मिनिट आहे.
मातीत रहाणारे प्रत्येक जातीचे गांडूळ हे मातीचा पोत सुधारण्याचे कार्य करतात.
- Epigeic गांडूळ मृत पानांचे त्यांच्या कास्टमध्ये लहान तुकड्यांमध्ये रूपांतरित करतात.
- Endogeic गांडूळ छोटी पाने वा मुळे खातात वा त्यांची विष्ठेमुळे मातीचा पोत बदलायला मदत होते.
- Anecic गांडूळ मूळे मृत व सुखी पाने खोल मातीत गाडली जातात.
ह्या कृतीतून जमिनीवरचा पाला पाचोळा फक्त जमिनीवर वर न राहता मातीत खोल पोचतो व सेंद्रिय पदार्थ मातीत पसरण्यास मदत होते.
मातीत रहाणार्या जीवांणूना होणारा फायदा
गांडुळांनी केलेल्या मातीतील बदलांचा मातीत रहाणार्या जीवाणू ह्या महत्त्वाच्या गटावर परिणाम होतो. जीवाणूंना जगण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा यांचे योग्य संतुलन आवश्यक असते.
हे जीवाणू सेंद्रिय पदार्थाच्या लहान तुकड्यांचे अगदी लहान लहान कणांमध्ये रूपांतर करतात, त्यांना कार्बन आणि नायट्रोजनमध्ये मोडतात. हे कण इतके लहान आहेत की वनस्पतींची मुळे सहजपणे ते शोषून घेतात आणि त्यांचा वाढीसाठी ऊपयोग करतात.
त्यांचे अन्न तोडण्यासाठी, जीवाणू ऑक्सिजन वापरतात (ते फुफ्फुस नसतानाही श्वास घेतात) आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. जर आजूबाजूला खूप पाणी असेल, जसे की पूर दरम्यान किंवा भाताच्या शेतात, तेव्हा जीवाणू त्याऐवजी नायट्रस ऑक्साईड तयार करतात. कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड हे हरितगृह वायू आहेत जे वातावरणाचे तापमान वाढवतात, त्यामुळे हवामान बदलास हातभार लावतात.
काही मातीत, जीवाणूंमध्ये सेंद्रिय पदार्थ, हवा किंवा पाण्याची कमतरता असू शकते आणि ते कमी सक्रिय असू शकतात. गांडूळ हे सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा अधिक उपलब्ध करून अशा जीवाणूंना "जागे" करू शकतात. गांडुळाच्या आतड्यात राहणाऱ्या बॅक्टेरियासाठी हा उपाय अधिक फायदेशीर आहे (आकृती क्र २). आतड्यात, सेंद्रिय पदार्थ आणि माती उत्तम प्रकारे मिसळली जाते. नायट्रस ऑक्साईड निर्माण करणाऱ्या जीवाणूंसाठी हे स्वर्ग आहे.
तर आपण बघितले की- गांडुळ कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड तयार करणारे जीवाणू उत्तेजित करतात, मग गांडूळ हे हरितवायू निर्माण करण्यास हातभार लावतात असे आपण म्हणू शकतो का?
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर गांडुळांच्या प्रभावाचा अभ्यास करणे
तर गांडुळां मुळे मातीततील इतर जीवाणू वर कसा परिणाम होतो आणि खरोखरच त्यांच्या मुळे हरितगृह वायू तयार होतो का? याचा अभ्यास करण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला.
एका प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी एक मातीने भरलेली भांडे घेऊन त्यातून छोटे जीव, खडक आणि रोपांची मुळे काढून टाकली, माती चांगली चाळुन घेतली. नंतर त्यात एकाच जातीची गांडुळे सोडली. अजुन एका भांड्यात नुसतीच माती ठेवली गांडूळ विना. दोन्ही भांड्यतील माती तपासण्यात आली. मातीच्या पृष्ठभागावर हरितगृह वायू चे उत्सर्जन किती होते तसेच मातीतील जीवाणू चा अभ्यास करण्यात येतो.
ह्या प्रयोगच्या निकालावरुन गांडूळ ह्यांचा मुळे हरितगृह वायू चे उत्सर्जन होते की नाही हे कळते.
निसर्गातील हरितगृह वायूंचे मोजमाप करण्याची दुसरी पद्धत शास्त्रज्ञ वापरतात. या प्रकरात, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साईड सारख्या वायूंचे मोजमाप करण्यासाठी दंडगोलाकार कक्ष जमिनीत ढकलले जातात (आकृती क्र ३).
ह्या मधे मातीतील गांडुळांचाही अभ्यास केला जातो जेणेकरून वैज्ञानिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन विपुल प्रमाणात आणि गांडुळांच्या प्रजातींच्या संख्येशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतील. शास्त्रज्ञ पाण्याचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता आणि pH यासह जीवाणूंच्या वाढी साठी महत्त्वाची मातीची इतर वैशिष्ट्ये देखील मोजू शकतात.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर गांडुळांचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सध्याच्या सर्व संशोधनातून माहिती गोळा करणे. तर, असे आढळून आले की, गांडुळे सरासरी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 33% आणि नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन 42% वाढवतात (५).
ह्यावरून हे सिद्ध होते की जरी गांडूळ हे मातीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, तरी ते काही प्रमाणात पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात कारण ते जीवांणू चा क्रियाकलाप (bacterial activity) आणि संबंधित हरितगृह उत्सर्जन वाढवतात.
ह्या संशोधनाला मर्यादा आहेत
आता पहा कशी पंचाईत आहे: गांडुळे मातीचे आरोग्य सुधारतात, परंतु त्याच वेळी ते हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढवतात! तथापि, आम्ही हा निष्कर्ष काढण्यापूर्वी, हे ओळखणे महत्त्वाचे आहे की आम्ही वर्णन केलेल्या प्रयोगांमध्ये सर्व त्रुटी आहेत ज्यामुळे ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनात गांडुळांची भूमिका पूर्णपणे निश्चित करणे कठीण होते.
ह्या त्रुटी काय आहेत ते पाहूया:
- गांडुळे, जीवाणू, माती, वनस्पती आणि पाणी यांच्यातील परस्परसंवादमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे घटक नैसर्गिक वातावरणात कमालीचे बदलतात आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये अचूकपणे पुन्हा तयार करणे फार कठीण आहे.
- बहुतेक गांडुळे साधारणपणे कमी वाळूचे प्रमाण असलेली माती पसंत करतात कारण ही वाळू लवकर कोरडी होते आणि वाळूचे कण त्यांच्या त्वचेसाठी अपघर्षक असू शकतात. मातीचा pH देखील गांडुळांवर परिणाम करू शकतो, आणि अनेक गांडूळ पीएच 4.5 पेक्षा कमी असलेल्या मातीत टिकू शकत नाहीत. निसर्गात अस्तित्त्वात असलेल्या हजारो विविध प्रकारच्या मातीसाठी प्रायोगिक भांडी बनवणे अत्यंत कठीण आहे, त्यामुळे आमचे ज्ञान सध्या विशिष्ट सामान्य प्रकारच्या मातीपुरते मर्यादित आहे.
- फारच कमी अभ्यासांमध्ये व प्रयोगांमध्ये वनस्पतींचा समावेश होता. वनस्पती त्यांच्या मुळांसह पाणी आणि पोषक द्रव्ये शोषून घेतात, ज्यामुळे गांडुळे आणि जीवाणूंसाठी पाणी आणि पोषक तत्वांची उपलब्धता कमी होते. तथापि, वनस्पती आणि जीवाणू देखील एकमेकांना मदत करतात. वनस्पतींची मुळे आजूबाजूच्या मातीमध्ये साखर तयार करतात जी वनस्पतींना आवश्यक असलेली खनिजे पुरवण्याच्या बदल्यात जीवाणू खाऊ शकतात. दुर्दैवाने, मातीमध्ये एकाच वेळी होणाऱ्या सर्व संभाव्य सकारात्मक आणि नकारात्मक परस्परसंवादांची चाचणी करू शकेल असा प्रयोग तयार करणे खूप कठीण आहे.
- आणखी एक मर्यादा अशी आहे की बहुतेक संशोधनांमधे जमिनीतील पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवले जाते हे सामान्यतः गांडुळ क्रिया अनुकूल करण्यासाठी केले जाते. निसर्गात, माती सतत कोरडी होत ज़ाते आणि पावसामुळे पुन्हा ओलसर होते. माती खूप कोरडी झाल्यास गांडुळे पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकतात. याचा अर्थ असा की ज्या प्रयोगांमध्ये मातीमध्ये पाण्याचे प्रमाण सतत बदलत असते ते हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर गांडुळांच्या नकारात्मक प्रभावांचा जास्त अंदाज लावू शकतात. प्रयोगशाळेच्या प्रयोगात ज्यात शास्त्रज्ञांनी अधिक वास्तववादी कोरडे- ओले चक्र वापरले, गांडुळांच्या उपस्थितीने नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन कमी असलेले आढळून आले (६). ह्या ओल्या- सुक्या चक्रांचे परिणाम अभ्यासणे खूप महत्वाचे आहे, विशेषत: चालू असलेल्या हवामान बदलामुळे ही चक्रे अधिक वारंवार आणि तीव्र होण्याची अपेक्षा आहे.
हवामान बदल - गांडुळांना दोष देऊ नका
मातीतून हरितगृह वायू उत्सर्जनाचा अभ्यास करणे किती अवघड आहे हे आम्ही तुम्हाला दाखवले. गांडुळे सेंद्रिय पदार्थांचे वितरण आणि जमिनीत पाणी आणि हवेची उपलब्धता बदलतात.
या सर्वांमुळे मातीतील जीवाणूंची क्रिया बदलते. तथापि, मातीचे जीवाणू मातीच्या गुणधर्मांवर, कोरडे-ओले चक्रांवर आणि तेथे वाढणाऱ्या वनस्पतींवर देखील अवलंबून असतात.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात गांडुळांची खरी भूमिका समजून घेण्यासाठी वास्तववादी प्रयोगांसह पुरेसा अभ्यास करण्यापासून आपण दूर आहोत. दुसरीकडे, मानवी क्रियाकलाप, विशेषत: शेती, मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू तयार करतात. म्हणून आपल्याला आपल्या पृथ्वीचे आणि सर्व सजीवांचे आरोग्य सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांनी विचार करणे आवश्यक आहे.
शब्दावली
इकोलॉजिकल ग्रुप (पर्यावरणीय गट)
गांडुळे मातीत कुठे राहतात, ते काय खातात आणि त्यांच्या त्वचेचा रंग कोणता आहे या संदर्भात भिन्न आहेत. तीन मुख्य गट आहेत.
सेंद्रिय पदार्थ
हे सेंद्रिय संयुगे बनलेले पदार्थ आहे जे जीवांचे अवशेष उदाहरणार्थ- वनस्पती आणि प्राणी आणि पर्यावरणातील त्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून बनते.
ऑक्सिजन
हा एक वायू आहे जो आपण श्वास घेतो त्या हवेच्या 21% भाग असतो. वनस्पती कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि सूर्यप्रकाशापासून ऑक्सिजन तयार करतात तर प्राणी श्र्वासोश्वासाठी ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डायऑक्साइड हवेत सोडतात.
कार्बन डायऑक्साइड
हा कार्बनचा एक अणू आणि ऑक्सिजनच्या दोन अणूंनी बनलेला रंगहीन वायू आहे. 1850 पासून त्याची वातावरणीय प्रमाण 0.028 वरून 0.042% पर्यंत वाढलं, ज्यामुळे जागतिक तापमानात 1° वाढ झाली.
नायट्रस ऑक्साईड
हा रंगहीन वायू आहे जो नायट्रोजनच्या दोन अणूंचा आणि एक ऑक्सिजनचा बनलेला असतो. हा हवेत खूप कमी प्रमाणात आहे परंतु एक नायट्रस ऑक्साईडचा एक रेणू , 270 कार्बन डाय ऑक्साईडचे रेणू एवढं वातावरण गरम करतो.
हरितगृह वायू
हा एक वायू आहे जो सौर ऊर्जा शोषून घेतो आणि उत्सर्जित करतो ज्यामुळे हरितगृह परिणाम होतो, म्हणजेच वातावरण तापते.
pH
रसायनशास्त्रात, pH हे द्रव द्रावणाची आम्लता(acid) किंवा अलकली(alkali) निर्दिष्ट करण्यासाठी वापरलेले स्केल आहे. आम्लयुक्त द्रावणांचे ph मूल्य अडकली किंवा क्षारीय द्रावणांपेक्षा कमी असते.
पोचपावती
लेखक तरुण समीक्षकाचे त्याच्या/तिच्या कसून कामासाठी आभार मानतात ज्यामुळे हस्तलिखित सुधारले.
लेखक TEBIS कन्सोर्टियम आणि CARABES (https://assocarabes.com) सारख्या भिन्न स्वयंसेवी संस्थेचे आभार मानतात ज्यांच्यासोबत लेखक नागरिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि माती आणि त्यांच्या जैवविविधतेच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. तपशीलवार रेखाचित्रांच्या गुणवत्तेबद्दल लेखक Morgane Arietta Ganault (www.lesbullesdemo.fr) यांचेही आभार मानतात.
संदर्भ
[१] Orgiazzi A, Bardgett R D, Barrios E, Behan-Pelletier V, Briones MJI, Chotte JL, De Beyn GB, Eggleton P, Fierer N, Fraser T, et al. Global soil diversity atlas. European Union. Luxembourg (2016). esdac.jrc.ec.europa.eu/public_path/JRC_global_soilbio_atlas_online.pdf
[२] Bottinelli N, Hedde M, Jouquet P, Capowiez Y. An explicit definition of earthworm ecological categories – Marcel Bouché’s triangle revisited. Geoderma (2020) 372:114361. doi:10.1016/j.geoderma.2020.114361
[३] Capowiez Y, Bottinelli N, Sammartino S, Michel E, Jouquet P. Morphological and functional characterisation of the burrow systems of six earthworm species (Lumbricidae). Biology and Fertility of Soils (2015) 51:869–877. doi:10.1007/s00374-015-1036-x
[४] Drake HL, Horn MA. Earthworms as a transient heaven for terrestrial denitrifying microbes: a review. Engineering in Life Sciences (2006) 6:261–265. doi:10.1002/elsc.200620126
[५] Lubbers IM, van Groenigen KJ, Fonte SJ, Six J, Brussaard L, van Groenigen JW. Greenhouse-gas emissions from soils increased by earthworms. Nature Clim Change (2013) 3:187–194. doi:10.1038/nclimate1692
[६] Chen C, Whalen JK, Guo X. Earthworms reduce soil nitrous oxide emissions during drying and rewetting cycles. Soil Biology and Biochemistry (2014) 68:117–124. doi:10.1016/j.soilbio.2013.09.020
EDITED BY: Malte Jochum, German Centre for Integrative Biodiversity Research (iDiv), Germany
SOURCE: Ganault P, Delmotte S, Duhamet A, Lextrait G and Capowiez Y (2021) Earthworms and Their Role in Greenhouse Gas Emissions. Front. Young Minds 9:562583. doi: 10.3389/frym.2021.562583
CONFLICT OF INTEREST: लेखक घोषित करतात की हे संशोधन कोणत्याही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंधांच्या अनुपस्थितीत आयोजित केले गेले आहे ज्याचा संभाव्य conflict of interest म्हणून समजला जाऊ शकतो.
COPYRIGHT © 2021 Ganault, Delmotte, Duhamet, Lextrait and Capowiez. This is an open-access article distributed under the terms of the Creative Commons Attribution License (CC BY). The use, distribution and reproduction in other forums is permitted, provided the original author(s) and the copyright owner(s) are credited and that the original publication in this journal is cited, in accordance with accepted academic practice. No use, distribution or reproduction is permitted which does not comply with these terms.
तरुण समीक्षक
ग्वेन, वय: १३
हाय! माझे नाव ग्वेन आहे, मी यूएस मध्ये राहतो आणि पियानो आणि व्हॉलीबॉल खेळतो. मी नुकतीच सातवी इयत्ता पूर्ण केली आहे आणि माझे आवडते विषय विज्ञान, गणित, कला आणि स्पॅनिश आहेत. मला वाचायला आवडते, विशेषतः साय-फाय कादंबऱ्या आणि मालिका (मी हॅरी पॉटरचा खूप मोठा चाहता आहे). फ्रंटियर्स फॉर यंग माइंड्ससोबत काम करताना मी खूप उत्साहित आहे!
लेखक
पियरे गॅनॉल्ट
निसर्गाच्या प्रत्येक वाटेवर, मी स्वत: ला पडलेली झाडे आणि खडक पलटवण्यापासून किंवा मृत पानांचा शोध घेण्यापासून थांबू शकत नाही कारण मला तेथे कोणता अद्भुत प्राणी लपलेला सापडेल हे सांगता येत नाही. या कुतूहलामुळे मी मातीच्या जैवविविधतेचा अभ्यास केला आणि मातीच्या अपृष्ठवंशी प्राण्यांवर झाडांच्या प्रजातींच्या मिश्रणाचा परिणाम आणि माती प्रक्रियेसाठी या प्राण्यांची भूमिका ह्या विषयावर Ph.D केली आहे. मी शास्त्रज्ञ आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी संघटनांसोबत देखील काम करतो जेणेकरून मातीत राहणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी, चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करू शकू. *pierre.ganault@gmail.com
साचा डेलमोटे
निसर्ग, मानव, विज्ञान आणि ज्ञानाचा प्रसार याविषयीच्या माझ्या आवडीमुळे मला पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र आणि भूगर्भशास्त्रात 7 वर्षांचा विद्यापीठीय अभ्यास करावा लागला. 3 ते 18 वर्षे वयोगटातील प्रेक्षकांना, मला आकर्षित करणाऱ्या गोष्टींबद्दल जागृत करण्यासाठी मी निसर्गाच्या मैदानात एक ॲनिमेटर देखील आहे.
ॲग्नेस दुहेमेट
Agnès एक Ph.D आहे. सागरी जीवशास्त्रातील विद्यार्थी. तिने एविग्नॉन विद्यापीठात जीवशास्त्रात पदवी मिळवली आणि मॉन्टपेलियर विद्यापीठात पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. तिला निसर्गाची आवड आहे आणि तिला नैसर्गिक विज्ञानांबद्दल ज्ञान प्रसारित करणे आवडते.
Gaëlle Lextrait
मी सूक्ष्मजीवांबद्दल नेहमीच उत्कट असतो, मग ते रोगजनक असो किंवा परस्परवादी. मी मातीत राहणारे लहान प्राणी (कीटक) आणि त्यांचे प्रतीक यांच्यातील परस्परसंवादाकडे वळलो. मी सध्या Gif-sur-Yvette (University Paris-Saclay) च्या CNRS येथे मायक्रोबायोलॉजीचा Ph.D विद्यार्थी आहे, जिथे मी stink bugs and their symbiotic bacteria ह्या विषयावर माझा अभ्यास चालू आहे.
यव्हान कॅपोविझ
यव्हान कॅपोविझ हे फ्रेंच ऍग्रोनॉमी इन्स्टिट्यूट (INRAE), Avignon, फ्रान्स येथे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे संशोधन गांडुळ पर्यावरण आणि वर्तन यावर केंद्रित आहे. गांडुळे जमिनीत कसे बीळ तयार करतात आणि परिणामी गांडुळे मातीच्या महत्त्वाच्या कार्यांवर कसा प्रभाव टाकतात, जसे की जलवाहतूक आणि सेंद्रिय पदार्थ पुरणे याचा अभ्यास करण्याचा त्याला व्यापक अनुभव आहे.
TRANSLATION
NUPUR SAWANT
FUNDING (TRANSLATION)
The team Translating Soil Biodiversity acknowledges support of the German Centre for integrative Biodiversity Research (iDiv) Halle-Jena-Leipzig funded by the German Research Foundation (DFG FZT 118, 202548816).